शेती पंपास वीज जोडणीसाठी २०१४ पासून शेतकरी प्रतीक्षेत ,शेतकऱ्यांचे आज पासून महावितरण कार्यालया समोर उपोषणाला बसणार
कुंडलवाडी (वार्ताहर): कुंडलवाडी येथील पाच शेतकऱ्यांना शेतीपंपाची वीज जोडणी न देताच बिले सुरु केल्याने सदरील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर वीज जोडणीसाठी चे पोल उभारून जोडणी द्यावी अन्यथा दि२३ नोव्हेंबर रोजी कुंडलवाडी महावितरण कार्यालय समोर उपोषणास बसणार आशा आशयाचे निवेदन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठवलेल्या निवेदनात उल्लेख केला आहे.
येथील पाच शेतकरी सन २०१४ ला आपल्या शेतात बोरवेल मारला होता वीज जोडणी साठी महावितरण कडे रीतसर कोटेशन भरले होते पण महावितरण ने सदरील शेतकऱ्यानं वीज जोडणीसाठी लागणारे पोल उभारणी न करता कुठलेच कनेक्शन न देता विजबिल चालू केले ,सदरील वीज जोडणीसाठी शेतकरी महावितरण च्या कार्यालयात चकरा मारत आहेत पण महावितरण च्या अधिकाऱ्यांनी सदरील कामासाठी शासनाकडून बजेट उपलब्ध करून दिले नाही,कॉन्ट्रॅक्टर नाही,पुढच्या वर्षी पोल उभा होतील असे उत्तर मिळाले आसल्याचे या निवेदनात शेतकऱ्यांनी केले आहे. अशोक रामजी गायकवाड , रामलू हुशेंना कोटलावार ,राजेंना राजेंना नागुलवार ,धनराज हणमंतराव रत्नागिरे ,भूमाबाई सायलू करेवाड यांना बिले आकारणी करून बिले सुरू महावितरण कडून करण्यात आल्याचे ही या निवेनात उल्लेख शेतकऱ्यांनी केला आहे.
Live News:
सदरील शेतीपंपास कनेक्शन कधी देण्यात आले ,कुठल्या आधारे वीजबिल आकारणी करण्यात आली,महावितरण अधिकारी नि आमच्या पाच शेतकऱ्यांला कुठलेच विजजोडणी न देता वीज बिल चालू केले आहेत .आशा आशयाचे निवेदन देऊन यात मागणी करण्यात आले असून दि २३नोव्हेंबर २० रोजी हे पाच शेतकरी कुंडलवाडी च्या महावितरण कार्यालय समोर उपोषण करण्याचा उल्लेख त्यांच्या स्वाक्षरी ने ऊर्जा मंत्री नितीन राऊत,उपअभियंता महावितरण धर्माबाद ,शाखा अभियंता महावितरण कार्यालय कुंडलवाडी ,तहसील कार्यालय बिलोली ,स्थानिक पोलीस स्टेशन आदी ठिकाणी निवेदनाच्या प्रती पाठलेल्या आहेत.
For more@Click_here
-SANTOSH CHAVAN
Deshonnati | Nanded
Feel free to comment your opinions and emotions
उत्तर द्याहटवा