शेतकऱ्याची दिवाळी अंधारात ना मदत खात्यात पडली ना पीकविमा कंपनी ची
कुंडलवाडी (वार्ताहर) :कुंडलवाडी परिसरात खरीप हंगामात बोगस बियाणे व अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते शासनाने संबधीत कंपनी कडून बोगस बियाणे पैसे दिले तर नाहीच तर अतिवृष्टीमुळे सर्व पीक वाहून गेले होते त्यांचा पीक विमा चे पैसे ची तुटपुंजी रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात टाकून पीकविमा कंपनी शेतकऱ्यांची बोळवण चालू केल्याने शेतकरी संतप्त झाला असून पीकविमा कंपनी सर्व शेतकऱ्याचा खात्यात शंभर टक्के नुकसानीची मदत लवकरात लवकर करावी अन्यथा पीकविमा कंपनी च्या विरोधात शेतकरी अदोलनाच्या दिशेने पाऊली उचलावी लागतील असे शेतकरी बोलवून दाखवत आहेत.
Live News:
या वर्षी शेतकऱ्याला सुरुवाती पासून नुकसानीचा सामना करावा लागत आहे खरीपाच्या पेरणी वेळेस काही कंपन्यांनी बोगस बियाणे शेतकऱ्याच्या माथी मारल्याने दुबार पेरणी साठी सामोरे जावे लागले होते ,शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा भरला होता ,दुबार पेरणी करत पाऊस चांगला झाल्याने पिके जोमात आली होती मोठया कष्टाने त्याची निगरानी करत पिके बहरली होती पण काढणीच्या तोंडावर अतिवृष्टी झाल्याने होत्याचे नव्हते झाले डोळ्यासमोर पिकांचे नुकसान झाले , शासनाच्या महसूल ,कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले ,नेत्यांनी शेतावर जाऊन नुकसानी ची पहाणी केली , काही शेतकरी पीकविमा कंपनी कडे ऑन लाईन तक्रारी नोंदवल्या या सर्व शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान पाहून सरसकट मदत करण्याचे शासनाने ठरवले हेक्टरी मदत पण जाहीर केली ही मदत दीपावली च्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार च्या घोषणा झाल्या पण अध्याप ती मदत खात्यात पडली नाही तर पीकविमा कंपनी पण शेतकऱ्यांच्या खात्यात अल्प विमा मजूर करत खात्यात टाकण्यास सुरुवात करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाला असून विमाकपनी सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानीचा मोबदला द्यावा अन्यथा अदोलनाच्या भूमिकेत असल्याचे चित्र सध्या या परिसरात दिसून येत आहे.
For more@Click_here
-SANTOSH CHAVAN
Feel free to Comment your opinions and emotions here
उत्तर द्याहटवाGood
हटवा