महावितरणचा एक गाव-एक दिवस उपक्रम : दौलापूर मधे राबवला
कुंडलवाडी (वार्ताहर): कुंडलवाडी शाखे महावितरणचे अभियंता ,कर्मचारी ची टीम ,कत्राटदार चे कामगार यांनी एक गाव एक दिवस या महावितरण चा उपक्रम दौलापूर या गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणीची कामे करून देत हा उपक्रम यशवी रित्या पार पाडत वीज ग्राहक च्या समस्या चे निरसन केले आहे.
एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला असून धर्माबाद उपविभागात गावा गावांमध्ये जाऊन कामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहेत. धर्माबाद चे उपकार्यकरी अभियंता सुमित पांडे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, धर्माबाद ही मोहीम सुरु केल्यावर आतापर्यंत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे, वीजबिल व वीजमीटर संदर्भातील तक्रारींच्या निवारणचा समावेश आहे.
Live News:
महावितरणकडून गावा गावात जाऊन तारांमधील झोल काढणे, वीज पुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्युशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, गांजलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येत आहेत.
अशाच प्रकरचा कार्यक्रम कुंडलवाडी शाखा अतंर्गत दौलापूर येथे जात वरील कामे पार पाडली या वेळी कनिष्ठ अभियंता सुजय निकम ,प्रधान तंत्रदय विठ्ठल गुंडले,बालाजी तळणे , श्रीरामे,मलेश मोतकेवार ,मीटर रीडर ,विठल वानखेडे ,गोविंद वानखेडे,पपु वानखेडे ,गंगाधर सोनटक्के ,राहुल ,विकास सोनटके,ज्ञानेश्वर वानखेडे,आदी जन उपस्थित राहून दुरुस्ती व देखभाल चे कामे करण्यात आली.
For more@Click_here
-SANTOSH CHAVAN